सातारा : महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्हयाचे पालकमंत्री यांना कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वीच बाळासाहेब पाटील हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बैठकीला उपस्थित होते. चाचणी अहवाल आल्यानंतर तातडीने पाटील यांना कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्याभोवती कोरोनाचा वाढता विळखा लक्षात घेता येथील यंत्रणेवर दिवसागणिक ताण हा वाढताना दिसत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे या परिस्थितीत सगळ्या यंत्रणेवर लक्ष ठेऊन यातून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्यांचा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

No comments:
Post a Comment